नागठाण्यातील रामरथ उत्साहात

नागठाणे : प्रभु रामचंद्रांच्या जयघोषात निघालेला रथोत्सव.

हजारो भाविकांची उपस्थिती : गुलालाची उधळण

नागठाणे, दि. 5 (प्रतिनिधी) – “प्रभू श्री रामचंद्र की जय’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या निनादात व गुलालाच्या उधळणीत भक्तिपूर्ण वातावरणात नागठाणे (ता. सातारा) येथील श्रीरामचंद्रांचा रथोत्सव पार पडला. रथोत्सवासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
यंदाही येथील “माळावरच्या यात्रेला’ उत्साहात सुरवात झाली. यात्रेचे मुख्य आकर्षण असणारी प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य रथयात्रा मंगळवारी पार पडली. दुपारी साडेबाराच्या सुमारास श्रीचौंडेश्वरी देवी मंदिरापुढील पटांगणात पंचायत समिती सभापती मिलिंद कदम यांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले. वर्णे गटाचे जि. प. सदस्य मनोज घोरपडे, युवा नेते सागर पाटील, धैर्यशील कदम, नागठाणे जि. प.सदस्या सौ. भाग्यश्री मोहिते, माजी जि. प.सदस्या सौ. सुवर्णाताई साळुंखे, नि. कॅप्टन नारायण साळुंखे, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन व अजिंक्‍यतारा साखर कारखान्याचे संचालक यशवंत साळुंखे, माजी पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण साळुंखे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण साळुंखे, अधिकाराव साळुंखे, जयवंतराव साळुंखे, श्रीराम कुलकर्णी, राजेंद्र साळुंखे, सरपंच विष्णू साळुंखे-पाटील, उपसरपंच सौ. मुक्ता राजे, मधुकर कुलकर्णी, ऍड. दत्तात्रय कुलकर्णी, मातोश्री बिल्डर्सचे सुधीर ठोके, विकास सेवा सोसायटी चेअरमन संजय साळुंखे, व्हा. चेअरमन दत्तात्रय साळुंखे, कृषीभूषण मनोहर साळुंखे, माजी सरपंच अविनाश यादव, अजित साळुंखे (सर), प्रकाश नलवडे, विजय साळुंखे, माजी सरपंच आनंदराव नलवडे, माजी पं. स.सदस्य पृथ्वीराज निकम, पतंगराव साळुंखे, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार नलवडे, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
रथपूजनानंतर हळू-हळू रथ पुढे सरकू लागला. रथापुढे नामवंत ब्रास बॅन्ड पथक होते तर दुसरीकडे ढोल-ताशांचा गजर सुरू होता. रथापुढे मानाचे अश्व होते. जागोजागी सुवासिनी पंचारतीने रथाचे पूजन करीत होत्या. रथोत्सवासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविक मोठया भक्तिभावाने रथावर गुलालाची उधळण करीत होते. नारळांची तोरणे, नोटांच्या माळाही अर्पण करीत होते.
हनुमान मंदिर चौक, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र मार्गे सायंकाळी उशिरा रथोत्सव माळावरील मुख्य बाजार तळावर पोहचला. बाजारतळावर पोहचल्यानंतर तेथील ग्रामपंचायतीच्या तात्पुरत्या कार्यालयासमोर ही यात्रा विसर्जित झाली. रथोत्सवासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रथोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी, विविध मंडळांचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)