नागठाण्याच्या युवकाला पिस्तुलासह तारळ्यात अटक

 

उंब्रज,  (वार्ताहर) – तारळे, ता. पाटण येथे गावठी बनावटीचे पिस्तुल घेवून संशयितरित्या फिरणार्‍या युवकाला उंब्रज पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. शनिवार, दि. 3 रोजी पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. साहिल रुस्तम शिकलगार (वय 21) रा. नागठाणे, ता. जि. सातारा असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याच्याकडील गावटी कट्यासह चार जीवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. यावेळी पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांनी गावठी कट्याची पाहणी करुन संशयितांची चौकशी केली. व पुढील तपासाच्या सूचना दिल्या. संशयितांवर यापूर्वी बोरगाव व उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रताप भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तारळे, ता. पाटण गावचे हद्दीत साहिल शिकलगार रा. नागठाणे हा युवक गावठी कट्टा घेवून रात्री येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार सपोनि प्रताप भोसले, हवालदार सतीश मयेकर, पोलिस नाईक लक्ष्मण जगधने, हवालदार जोतिराम भुजबळ, प्रवीण फडतरे सापळा लावला. दरम्यान पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास चौकीचा आंबा येथील रोडवर एक युवक लाईटच्या उजेडात नागठाणे बाजूकडून चालत येत असताना आढळून आला.

पोलिसांना पाहताच संशयिताने पळुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करूण त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याजवळ एक गावटी कट्टा मिळून आला. तसेच त्याचे जीन्स पॅन्टच्या खिशात 4 जिवंत काडतुसे मिळून आली. याप्रकरणी संशयित साहिल शिकलगार यास पोलिसांनी अटक केली . त्यानंतर त्याला पाटण न्यायालयात हजर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)