नागठाणे येथील घनकचरा प्रकल्प जिल्ह्यात ठरतोय आयडॉल

रत्नागिरी जिल्ह्याने केले कौतुक

नितीन साळुंखे
नागठाणे, दि. 6 – सातारा जिल्ह्याने विविध अभियान, उपक्रम व योजनांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन राज्यासह देशाचे लक्ष वेधून घेऊन ‘स्वच्छ भारत अभियान’ मध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे. यामध्ये नागठाणे (ता. सातारा) येथील ग्रामपंचायतीने राबविलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा आयडॉल ठरत आहे. नुकतीच रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सुमारे 165 सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी नागठाणे गावास भेट दिली.
नागठाणे गावाने राबविलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा सातारा जिल्ह्यात आदर्शवत ठरला आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये सातारा जिल्ह्याचे नाव प्रथम क्रमांकावर आणण्यात या प्रकल्पाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे हा प्रकल्प पाहण्यासाठी महाराष्ट्रातील बहुतांश लोक भेट देत आहे. नुकतेच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हा परिषदेचे विविध अधिकारी व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व अधिकारी यांनी नागठाणे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट दिली.
नागठाणे गावचे सरपंच विष्णू साळुंखे यांनी सर्व पाहुण्यांचे यावेळी स्वागत केले. ग्रामविकास अधिकारी सचिन पवार यांनी या प्रकल्पाची विस्तृत माहिती यावेळी दिली. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आलेल्या टीमने या प्रकल्पाचे कौतुक केले. यावेळी रत्नागिरी जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मखळ, कार्यकारी अभियंता बरवडी, जिल्हा कृषी अधिकारी आरिफ शहा,रत्नागिरी जिल्हयातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सायमोते रत्नागिरी जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, नागठाणे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)