नागठाणे चौकात कोंडी नित्याचीच

प्रभात  स्पेशल

नागठाणे  – ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्गावर असलेल्या नागठाणे चौकात होणारी वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच ठरु लागली आहे. वारंवार होणारे अपघात, अपघातांमुळे अनेकांचे जाणारे प्राण आणि अनेकजण जायबंदी होण्याच्या घटना या चौकाला आणि नागठाणेकरांना नवीन नाहीत. मात्र दुर्दैव एवढेच की या चौकात होणारी कोंडी आणि अपघातांवर प्रशासनाकडून आजवर कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत आणि भविष्यात तरी त्या होतील की नाही याबाबतही शंकाच आहे. नागठाणे बसस्थानक परिसरात कोल्हापुर पुणे महामार्गावर खाजगी वाहनधारकांच्या गाड्या अस्ताव्यस्त पार्किंग केल्या जात असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. खाजगी चालकांच्या मनमानीमुळे प्रवासी हैराण झाले असून या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे महामार्ग ओलंडताना बरेच अपघात होत असतात. यातून बऱ्याच जणांना जीव गमवावे लागला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचबरोबर नागठाणे महामार्गापासून सासपडे चौक असणाऱ्या कायम रहदारीच्या रस्त्यावर होणाऱ्या दोन्ही बाजूने होणाऱ्या पार्किंगमुळे या मार्गावर वहातुकीची कोंडी ही नित्याचीच होत आहे. नागठाणे ग्रामपंचायत व बोरगाव पोलीस यांनी संयुक्तपणे हा मार्ग नो पार्किंग झोन अथवा वन साइड पार्किंग करावा, अशी मागणी होत आहे. बोरगाव पोलिसांनी या स्टॅण्ड परिसरात अस्ताव्यस्त होणाऱ्या पार्किंगला लगाम घालवा, अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून नेहमीच होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)