नागठाणे कॉलेजमध्ये एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात

नागठाणे – येथील आर्टस्‌ ऍण्ड कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षानिमित्त अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत न्यू फ्रेमवर्क ऑफ नॅक या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
या कार्यशाळेप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाचगणी येथील मीनलबेन मेहता महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते. याप्रसंगी ते म्हणाले की, महाविद्यालयांनी पूर्ण तयारनिशी नॅकला सामोरे जाणे आवश्‍यक आहे.

प्राध्यापकांनी आपल्या अध्ययन, अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कालानुरूप राहणे गरजेचे आहे. तसेच विविध विद्यार्थीभिमुख, समाजाभिमुख उपक्रम राबवून त्याचे डाक्‍यूमेंटेशन वेळच्या वेळी करणे जरूरीचे आहे. त्याचबरोबर महाविद्यालयाची वेबसाईट अद्ययावत ठेवत ऑनलाईन फीडबॅक, ईटेस्ट अशा आधुनिक तंत्रज्ञानाधारित सामग्रीचा उपयोग केला पाहिजे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शेळके म्हणाले की, नॅकला सामोरे जाताना महाविद्यालयांनी अध्यापनाबरोबरच विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवून आपली गुणवत्ता सतत वाढवित राहिले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक डॉ. अजितकुमार जाधव यांनी केले. आभार प्रा. आण्णासाहेब वसेकर यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. शौकत आतार यांनी केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील तसेच इतर महाविद्यालयातील प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)