नागठाणेत युवतीचा संशयास्पद मृत्यू

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा नातेवाईकांचा आरोप

नागठाणे – नागठाणे (ता. सातारा) येथील बेघर वस्तीमध्ये राहणारी कु. समीक्षा संजय जाधव (वय 22) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. युवतीच्या संशयास्पद मृत्यूमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण झाले. ही घटना बुधवारी रात्री घडली असून आत्महत्येचे नेमके कारण काय हे अद्याप अस्पष्ट असून बोरगाव पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागठाणे (ता. सातारा) येथील बेघर वस्तीत संजय जाधव हे आपल्या एक मुलगा ओंकार व मुलगी समीक्षा यांच्यासह रहात आहेत. बुधवारी सायंकाळी समीक्षा हिने आपल्या राहत्या घरी घरात कोणीही नसताना घराच्या तूळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घराजवळील शेजाऱ्यांना समजल्यानंतर शेजाऱ्यांनी युवतीच्या भाऊ ओंकार व वडील संजय जाधव यांना घटनेची माहिती सांगितली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समीक्षाचा भाऊ ओंकार याने तात्काळ बोरगाव पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देऊन ही आत्महत्या नसून आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याची तक्रार केली असून ज्याने आत्महत्येस प्रवृत्त केले आहे त्याच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी या घटनेचा तपास योग्यरीत्या करून जर कोणी कु. समीक्षा हिस आत्महत्येस प्रवृत्त केले असेल तर त्याचा तपास करून गुन्हा दाखल करू असे आश्‍वासन दिले. त्यानंतर तणाव निवळला आणि मृत समीक्षाचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. या घटनेची नोंद बोरगाव पोलीसात दाखल झाली असून तपास सहायक फौजदार भीमराव यादव करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)