नागठाणेत क्रिकेट स्पर्धेला दिमाखात प्रारंभ

नागठाणे, दि. 15 (प्रतिनिधी)- सनी स्पोर्टस अँड हेल्थ क्‍लब व बोरगाव पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नागठाणे (ता. सातारा) येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेला बुधवारी प्रारंभ झाला. स्पर्धेत मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापुर, पूणे, जिल्ह्यातील संघ सहभागी झाले आहेत.
तरुणांना खेळाची गोडी लागावी, सर्व जाती धर्माचे लोक खेळाच्या माध्यमातूनच एकत्र येत असतात अन्‌ ही एकीच समाज घडवत असते हा उद्देश ठेवूनच सनी स्पोर्टस व बोरगाव पोलीस ठाणे यांनी एकत्र येऊन या भव्य क्रिकेट स्पर्धचे आयोजन केले आहे. सातारा पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेच्या प्रारंभ झाला.
यावेळी बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष चौधरी, नागठाणेचे सरपंच विष्णू साळुंखे पाटील, जनता बॅंकेचे संचालक बाळासाहेब लोहार, खाजगी शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित साळुंखे, उद्योजक बापूसाहेब राजे, विरेंद्र करिअर अकॅडमीचे विजय पवार, जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक नारायण साळुंखे, मातोश्री ग्रुपचे सुधीर ठोके, साक्षी सप्लायरचे नितीन साळुंखे, छत्रपती ग्रुप साताराचे सदस्य तसेच नागठाणे ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सदस्य बोरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्यासह खेळाडू व प्रेक्षक उपस्थित होते. स्पर्धेसाठी मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापुर व पुणे जिल्ह्यातील संघ सहभागी झाले आहेत. दरवर्षी भरवण्यात येत असलेल्या सामन्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी स्पर्धेचा समारोप आणि बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्या संघांना अनुक्रमे एक लाख, पन्नास हजार, अकरा हजार आणि दहा हजार रुपयांची बक्षीसे व शिल्ड देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक बक्षिसे ही देण्यात येणार आहेत. सुधीर साळुंखे यांनी प्रास्ताविक केले अनिल चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले. नितीन साळुंखे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)