नागठाणेतील क्रिकेट स्पर्धेत इंदोली संघ अजिंक्‍य

नागठाणे – येथील छत्रपती प्रतिष्ठान व बोरगाव पोलीस यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक इंदोली क्रिकेट क्‍लब यांनी पटकाविले. तर द्वितीय एकसंघ क्रिकेट क्‍लब नागठाणे, तृतीय लॉयन क्रिकेट क्‍लब तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक नांदगाव क्रिकेट क्‍लबला मिळाले.

विजेत्या संघास अनुक्रमे प्रथम क्रमांकास 21111, द्वितीयसाठी 15555 तर तृतीयसाठी 11111 तर चतुर्थसाठी 7777 रुपये व चषक असे देण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभ बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी, जि. प. सदस्या भाग्यश्री मोहिते, के. एम. शुगर पडळचे संचालक युवराज साळुंखे, अविनाश गोरे, वैभव साळुंखे यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुषार साळुंखे, नवनाथ पवार, सूरज पवार यांनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)