नागठाणेच्या रोशनी साळुंखेची पीएसआयपदी निवड

नागठाणे, दि. 27 (प्रतिनिधी) – येथील रोशनी सुरेश साळुंखे या शेतकऱ्याच्या मुलीने 2016 साली झालेल्या महाराष्ट्‌ राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तिची राज्य शासनाच्या पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. सन 2016 साली झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रात महिलांमध्ये 27 वा क्रमांक मिळविला आहे. तसेच नागठाणे गावात प्रथमच एक महिला अधिकारी होण्याचा मानही तिने मिळविला आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण नागठाणे येथील नवीन मराठी शाळा तर माध्यमिक शिक्षण श्री रामकृष्ण विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज तसेच सायन्समधून पदवीपर्यंतचे शिक्षण यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज सातारा येथे झाले. रोशनी साळुंखे हिच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. आई-वडील शेतकरी असून जेमतेम शेती असताना रोज शेतीत काबाडकष्ट करून घरखर्च भागवत त्यांनी आपल्या मुलीला त्यांनी शिक्षण दिले. प्रतिकूल परिस्थितीत व अडचणीवर मात करत तिने जिद्द व अथक परिश्रम करीत हे यश मिळविले आहे. तिच्या या निवडीने नागठाण्यासह परिसरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)