नागझिरा अभयारण्य पेटले; वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान

गोंदिया : येथील प्रसिद्ध नागझिरा व्याघ्र प्रकल्पात गेल्या ८ दिवसांपासून भीषण आग लागली आहे. यामुळे सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील वनसंपदेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याचा मोठा फटका वन्यजीवांनादेखील बसला आहे. दरम्यान, तेंदुपत्यासाठी ही आग लावण्यात आली आहे का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आगीच्या कारणाची माहिती मिळताच वन विभागातर्फे योग्य ती कारवाई केली जाईल, असे वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे. व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे अधिकच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, तेंदुच्या पानासाठी मजुरांनी आग लावली असल्याच्या संशय वनविभागाने व्यक्त केला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)