नाकीसुमो फेस्टिव्हल -लहान मुलांना रडवण्याची जपानी स्पर्धा

टोकियो (जपान) – नाकिसुमो फेस्टिव्हल हा जपानमधील एक आगळा वेगळा आणि थोडासा विचित्र महोत्सव आहे. हा महोत्सव म्हणजे लहान मुलांची रडण्याची स्पर्धा असते. सामान्यत: पालक आपली मुले रडू नयेत याची काळजी घेतात. पण नाकीसुमो महोत्सवात मूल जास्तीत जास्त मोठ्याने आणि जास्तीत जास्त वेळ कसे रडेल हे पाहिले जाते. त्यासाठी पालक अगोदर अनेक दिवस मेहनत घेतात.

जपानमधील अनेक मंदिरांमध्ये नाकिसुमो महोत्सवाचे आयोजन केले जाते. परंतु आसाकुसा येथील सेन्सोजी मंदिरातील नाकीसुमो महोत्सव आकर्षणाचे मुख्य केंद्र असते. देशविदेशातील असंख्य लोक मीडियावाले या महोत्सवासाठी आवर्जून येतात आणि याचे फोटो आणि वृत्तांत आपल्या देशांमध्ये पाठवतात. शनिवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या नाकीसुमो महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

नाकीसुमो महोत्सवाला 400 वर्षांची परंपरा आहे. या महोत्सवात रडणाऱ्या मुलांना इडापिडा बाधत नाहीत अशी समजूत आहे. पालक आपल्या लहान मुलांना घेऊन आल्यानंतर त्यांना सुमो मल्लांच्या स्वाधीन केले जाते. 150 किलोगृऍमपेक्षा अधिक वजनाचे आणि महाकाय आकाराचे हे सुमो मल्ल मग मुलाना हवेत उंच धरतात. चित्रविचित्र आवाज करतात, तोंडे वेडीवाकडी करून, उड्या मारून त्यांना घाबरवतात मग या घाबरलेल्या मुलांमध्ये कोण सर्वात मोठ्यांदा आणि सर्वात जास्त वेळ रडते हे पाहिले जाते. ही सर्व मुले एक वर्षापेक्षा कमी वयाची असतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)