नाओमी ओसाका आहे तरी कोण?

जपानची 20 वर्षीय युवा खेळाडू नाओमी ओसाकाने, अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सवर मात करुन अमेरिकन ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. ओसाकाचं हे पहिलं ग्रॅंडस्लॅम विजेतेपद ठरलं आहे. 6-2, 6-4 च्या फरकाने सामना जिंकत ओसाकाने विल्यम्सला विश्‍वविक्रमी कामगिरीशी बरोबरी करण्यापासून रोखलंय. अशी कामगिरी करणारी ती पहिली जपानी खेळाडू ठरली आहे. या विजयानंतर सोशल मीडियावर सर्वच ठिकाणी नाओमी ओसाकाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे नाओमी

विषयी थोडी माहिती – 
16 ऑक्‍टोबर 1997 साली नाओमी ओसाकाचा जन्म झाला. 1999 साली सेरेना विल्यम्सने आपलं पहिलं अमेरिकन ओपनचं विजेतेपद मिळवलं, यावेळी नाओमी ही अंदाजे एक ते दीड वर्षाची होती. ग्रॅंडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारी नाओमी पहिली जपानी खेळाडू ठरली आहे. तर आशिया खंडातून ग्रॅंडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारी दुसरी खेळाडू ठरली आहे. याआधी चीनच्या ली ना या खेळाडूने अशी कामगिरी करुन दाखवली आहे. लहानपणापासूनच सेरेना विल्यम्स ही ओसाकाची सर्वात आवडती खेळाडू होती. वयाच्या तिसऱ्या वर्षी नाओमी अमेरिकेला आली, तर, 2013 सालात नाओमीने प्रोफेशनल टेनिसमध्ये प्रवेश केला. सेरेना विल्यम्सचे एकेकाळचे प्रशिक्षक साशा बाजिन यांच्याकडे नाओमी फ्लोरिडा येथे सध्या प्रशिक्षण घेते आहे.

2014 साली ऑकलंड डब्ल्युटीएस्पर्धेत नाओमीने पहिल्यांदा आपल्या कामगिरीने सर्वांना दखल घेण्यास भाग पाडलं. तर, 2016 सालची ऑस्ट्रेलियन ओपन ही नाओमीची पहिली ग्रॅंडस्लॅम स्पर्धा होती. एप्रिल 2016 मध्ये नाओमीने पहिल्यांदा जागतिक क्रमवारीत पहिल्या 100 खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं. पुढील वर्षभरातच नाओनमीने आपल्या खेळात सुधारणा करत पहिल्या 50 खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला. मार्च 2018 मध्ये नाओमीने आपलं पहिलं डब्ल्युटीएस्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. या स्पर्धेत नाओमीने मारिया शारापोव्हा, कॅरोलिना पिलीस्कोव्हा आणि सिमोना हेलप यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूंना पराभवाचा धक्‍का दिला होता. यानंतर मार्च महिन्यात मियामी येथे झालेल्या एका स्पर्धेत नाओमीने सेरेना विल्यम्सला हरवलं होतं. 17 जुलै 2018 रोजी नाओमीने आपल्या कारकिर्दीतलं सर्वोत्तम स्थान पटकावलं. या कालावधीत ती 17 व्या स्थानावर आली. सध्या ती 19 व्या स्थानावर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)