‘नाईट’ नाही, आता “दिवस-रात्र शेल्टर’

महापालिका करणार सुधारित धोरण

पुणे – प्रवासानंतर शहरात रात्री उशिरा येणाऱ्या आणि रस्त्यावर झोपणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली “नाईट शेल्टर’ आता “दिवस-रात्र शेल्टर’ असणार आहेत. ही “शेल्टर’ दिवसाही सुरू ठेवावी, याबाबत राज्य शासनाने महापालिकेस सूचना केल्या आहेत.

-Ads-

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेने चार वर्षांपूर्वी शहरात चार ठिकाणी “नाईट शेल्टर’ सुरू केलेली आहेत. यामध्ये नागरिकांना केवळ रात्रीच्या वेळी मुक्‍कामासाठी मुभा दिली जात असून येथे पालिकेने पाणी, लाईट तसेच स्वच्छतागृह अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा वापर प्रामुख्याने रस्त्यावर दिवसभर साहित्य विक्री करून पोट भरणारे नागरिक तसेच प्रवासी करत आहेत. येथे उपलब्ध निवासाच्या क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात त्याचा लाभ घेतला जात आहे. असे चित्र असतानाच, आता ही “शेल्टर’ 24 तास सुरू ठेवावीत, अशा सूचना राज्य शासनाने महापालिकेस केल्या आहेत. तसेच येथे आवश्‍यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेशही देण्यात आले आहे. त्यानुसार, महापालिकेच्या समाज कल्याण विभागाने या बाबत कार्यवाही सुरू केली असून, ही “शेल्टर’ दिवसा सुरू केल्यास त्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी धोरण तयार करण्याचे काम सुरू केल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

तीन शेल्टर सुरू
महापालिकेची सध्या तीन “शेल्टर’ सुरू आहेत. यात येरवडा, सेनादत्त पोलीस चौकी तसेच बोपोडी येथील शेल्टरचा समावेश असून पुणे स्टेशनसमोरील पार्किंगधील “शेल्टर’ चालविण्यासाठी ठेका दिलेल्या स्वयंसेवी संस्थेची मुदत संपल्याने ते पुन्हा सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, ही “शेल्टर’ दिवसा सुरू करायची झाल्यास त्यासाठी आवश्‍यक सेवा, त्याचे नेमके लाभार्थी तसेच इतर काही धोरणात्मक निर्णय घेणे आवश्‍यक असल्याने त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)