नांदे येथील गायरान परिसरात वृक्षारोपण

पिरंगुट – नांदे (ता. मुळशी) येथे ग्रामपंचायत नांदे आणि लुपीन फाउंडेशनच्या वतीने गायरान तसेच स्मशानभूमी परिसरात 150 वृक्षांची लागवड करण्यात आली. स्पोनो, कांचन, कडुनिंब, पिंपळ, बदाम, गुलमोहर आदी प्रकारची रोपे यानिमित्त लावण्यात आली. लुपिन फाउंडेशनच्या वतीने या रोपांची जोपासना होण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, पुणेचे असिस्टंट कमिश्नर-सकरीकर, औषध निरिक्षक चौधरी साहे, सचिन कांबळे, बी. डी. कदम, जे. पी. सावादत्ती, लुपीन कंपनीचे प्रमोद कुलकर्णी, नंदकुमार पिल्ले, व्यंकटेश शेटे, सावबा शिंदे, नवनाथ शिंदे, रुपेश सावंत, सरपंच प्रशांत रानवडे, माजी सरपंच विठ्ठल रानवडे, ग्रामसेविका भुजबळ, माउली जाधव, मारुती मारणे, अजय करंजावणे, विजय डांगे, सचिन डांगे, आनंद रानवडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)