नांदेत हिवाळी श्रमसंस्कार शिबिराची सांगता

पिरंगुट- लवळे (ता.मुळशी) येथील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय व आकुर्डी येथील डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर नांदे (ता. मुळशी) येथे पार पडले. शिबिराचे उद्‌घाटन रेल्वे मंत्रालयाचे सहसंचालक सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. पाटील, सरपंच मारुती रानवडे उपस्थित होते. या शिबिरामधे स्वयंसेवकांनी गावामधे प्रभात फेरी, सर्वेक्षण, स्वच्छता अभियान, श्रमदान, समाजप्रबोधनपर ‘मुलगी शिकवा मुलगी वाचवा’ व दारुबंदी आदी पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. योगेश खैरनार, योगगुरु मारुती पाडेकर, प्रा.प्रदीप अत्रे, प्रा. संकेत पवार, प्रा. बोबडे आदिंची व्याख्याने झाली. ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत स्वयंसेवकांनी येथील परिसरातील साफसफाई करून गाव चकाचक केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद साळुंखे, प्रा. रोहित शिंदे, प्रा. संग्राम पाटील, सागर धामोने यांनी संयोजन केले होते. यावेळी प्रशांत रानवडे, विट्ठल रानवडे, दत्तात्रय रानवडे, सचिन डांगे, विजय डांगे, वसंत भालेकर आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)