नांदेत लुपिन कंपनीतर्फे आरोग्य शिबिर

पिरंगुट – लुपिन कंपनीला 50 वर्ष पूर्तीनिमित्त नांदे (ता. मुळशी) येथे महिला मेळावा व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नांदे ग्रामपंचायत, लुपिन कंपनी व गावातील महिला संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या आरोग्य शिबिरात 180 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. भारती विद्यापीठाच्या डॉ. सुमेती संचेती, डॉ. किर्ती चिपटे यांच्या पथकाने तपासणी केली. महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यातील विजेत्या महिलांना बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. गावातील घनकचरा व्यवस्थापन करण्यासंबंधी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. लुपिन फाउंडेशनच्या वतीने महिलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सॅंनीटरी नॅपकीन पॅडची मशीन महिला स्वयंसहायता गटाला भेट देण्यात आली. यावेळी सभापती कोमल बुचडे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, सरपंच प्रशांत रानवडे, उपसरपंच अश्विनी रानवडे, माजी उपसरपंच विठ्ठल रानवडे, पोलिस पाटील दत्तात्रय रानवडे, ग्रामपंचायत सदस्य मारुती रानवडे, विद्या रानवडे, वैशाली करंजावणे, सविता ढमाले, तंटामुक्‍ती अध्यक्ष अजय करंजावणे, विजय डांगे, आकाश रानवडे, लुपिनचे प्रकल्प समन्वयक व्यंकटेश शेटे, सखी महिला संघाच्या अध्यक्षा स्वाती ढमाले, पल्लवी पारधे, स्वाती रानवडे, आरती रानवडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)