नांदेड : शिक्षा भोगणारा कैदी सरकारी दवाखान्यातून गेला पळून

नांदेड – तीन खुनांचे आरोप आणि एक दरोडा प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप आणि एका शासकीय कामात अडथळा यांसारख्या प्रकरणात शिक्षा भोगणारा कैदी गुन्हेगार मध्यरात्री नांदेडच्या सरकारी दवाखाना परिसरातून पळून गेल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांकडून शोधकार्य सुरू झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सकाळपासूनच सरकारी दवाखान्यात बसून आहेत. अद्याप तरी त्या पळून गेलेल्या कैद्याचा काही शोध लागला नाही.

अधिक माहिती अशी की, नांदेडच्या तुरुंगात असलेला कैदी क्रमांक 1348 याचे नाव सरसूलसिंघ उमरसिंघ फौजी उर्फ शाहू (वय31) यास निझामाबाद न्यायालयाने नांदेड तुरुंगात दिनांक 16 ऑगस्ट 2017 रोजी पाठवले होते. त्यावर बिलोली न्यायालयात एक दरोडा प्रकरणात सुनावणी सुरु होती त्यासाठी त्यास नांदेडच्या तुरुंगात पाठवले होते. त्या कैदी सरसूलसिंघ फौजीला नांदेडच्या एक सरकारी कामात अडथळा प्रकरणात शिक्षा झाली होती. ती शिक्षा 26 ऑगस्ट 2017 रोजी संपणार होती. नांदेड तुरुंगात आल्यावर सरसूलसिंघ फौजी आजारी असल्याची तक्रार केली. तेव्हा तुरुंग व्यवस्थापनाने त्यास पोलीसांच्या साथीने उपचारासाठी सरकारी दवाखाना येथे पाठवले.

28 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास सरसूलसिंघ फौजी सरकारी दवाखान्यातील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला.या सरसूलसिंघ फौजीविरुद्ध जिल्ह्यातील मरखेल, रामतीर्थ आणि बिलोली पोलीस ठाण्यात तीन खून प्रकरणे प्रलंबित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)