नांदेड-लोहा महामार्गावर भीषण अपघात; 3 ठार तर 4 जखमी

नांदेड – जीप व आयचर टेम्पोंच्या झालेल्या भिषण अपघातात तीन जण ठार तर चार जण
गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अधिक माहिती अशी की, नांदेड ते सोनखेड मार्गावर आज दुपारी 3 च्या सुमारास आयचर टेम्पो क्र. एम. एच. 22 एए 0451 नांदेडकडे येत असतांना समोरून येणाऱ्या जीप क्र. एम.एच. 26 सी 4703 जीपचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात जीप चालक निवृत्ती वाघमारे (वय 60, रा. सिद्धार्थनगर कंधार, मुद्रीकाबाई नागरगोजे) मछींद्र नागरगोजे (वय 10) यांचा मृत्यू झाला. तर दत्ता नागोराव केंद्रे, भिमराव ग्यानोजी वाघ, नानाराव विठ्ठल वाघ हे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर, पोलीस निरीक्षक सुनिल निगाळजे, सोनखेड पोलीस स्थानकाचे डी. एच. काकडे, पोलीस उपनिरीक्षक कल्याण नेहरकर यांनी घटना स्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून जखमीवर उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)