नांदेड: रेल्वे विभागा तर्फे धडक तिकीट तपासणीची मोठी मोहीम

नांदेड रेल्वे स्थानकाचे संग्रहित छायाचित्र

 2 लाख रुपये दंड वसूल…
नांदेड : दक्षिण मध्य रल्वे, नांदेड विभाग विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेत असते. तसेच आता ही मोहीम अचानक पणे राबविले जात आहे. यात तिकीट तपासणी सोबतच रेल्वे तील इतर सुविधांचीही तपासणी केली जात आहे, जसे कि स्वछता, खाद्य पदार्थ, पाणी, त्यांच्या किमती,पाण्याची उपलब्धता, पंखे, लाईट यांची चालू स्थिती,इत्यादी ची हि तपासणी केली जात आहे.

हि मोहीम सकाळीच 5 वाजता सुरु करण्यात आली. यात नांदेड ते सेलू या दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या मध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. यात 02 सवारी गाडया आणि 11 एक्स्प्रेस रेल्वे गाड्या तपासण्यात आल्या. यात अचानक धावत्या गाड्यांमध्ये धाडी टाकण्या करीत बसेसचा वापर करण्यात आला. धावणाऱ्या रेल्वे मध्ये सेक्‍शन मध्ये अचानक धाड पडल्याने विना तिकीट प्रवाश्‍यांचे धाबे दणाणले. यात तब्बल 278 विनातिकीट प्रवाशी सापडले. तसेच अनियमित प्रवास करणे आणि परवानगी शिवाय जास्त समान घेवून जाण्यामुळे काही प्रवाश्‍यांवर कार्यवाही करण्यात आली.

तसेच 26 अनअधिकृत विक्रेते खाद्य पदार्थ विकत होते त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात आली. त्यांना पकडून त्यांच्या कडून 58000 रुपये दंड वसूल करण्यात आला. ते जे अनअधिकृत फेरीवाले वाटर बोटल, समोसे आणि इतर पदार्थ विकत होते ते जप्त करण्यात आले. या फेरीवळ्यांचा बायो डाटा बनवण्यात आल्या. पुन्हा हे फेरीवाले रेल्वे गाड्यांमध्ये अश्‍या प्रकारे अनअधिकृत पदार्थ विकणार नाहीत याची त्यांना टाकीत देण्यात आली. तसेच सेलू रेल्वे स्थानकांवरील अधिकृत कॅंटीन मध्ये अनअधिकृत पाणी बोटल विकण्यात येत होत्या. त्यांच्यावरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली, 5000 रुपये दंड आकारण्यात आला.  या तिकीट तपासणी मुळे कोणतीही रेल्वे गाडी उशिरा धावणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)