नांदेड पोलीस भरती घोटाळ्यातील 15 आरोपी अटकेत

मुख्य आरोपी प्रवीण भटकरसह पाच आरोपी फरार
नांदेड – नांदेड पोलीस भरती घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण भटकरसह पाच आरोपी अद्यापही फरार आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.

नांदेड पोलिसांनी या घोटाळ्याचा अहवाल पोलीस महासंचालकांकडे पाठवला आहे. दरम्यान, दिवसेंदिवस या घोटाळ्याची व्याप्ती आता वाढत आहे. या सर्व आरोपींनी 17 जिल्ह्यात असेच प्रकार केल्याचे तपासात उघकीस आले आहे.
घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकर आणि त्याच्या साथीदाराने सीआरपीएफच्या उमेदवारांकडून अडीच कोटी रुपये जमा केले, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

प्रवीण भटकर याच्या एसएसजी या कंपनीकडे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम होते. याचाच गैरफायदा घेत या कंपनीने उमेदवारांकडून पैसे उकळले आणि हा घोटाळा केल्याचे तपासात निष्पण झाले आहे.

दरम्यान, नांदेडसह राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी, एसएसजीचे दोन कर्मचारी यांच्यासह एकूण 20 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)