नांदेड पोलिस भरती घोटाळ्यात 15 आरोपींना अटक

नांदेड : नांदेडमध्ये पोलिस भरती घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी प्रवीण भटकरसह पाच आरोपी अद्यापही फरार आहेत. या सर्व फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे पोलिस महासंचालकांनी या प्रकरणात नांदेड पोलिस अधीक्षकांचे अभिनंदन केले आहे.

नांदेड पोलिसांनी या घोटाळ्याचा अहवाल पोलिस महासंचालकांकडे पाठवला आहे. वरवर लहान वाटणार्‍या या घोटाळ्याची व्याप्ती आता वाढत असून सर्व आरोपींनी एकूण 17 जिल्ह्यात असेच प्रकार केल्याचे तपासात समोर येत आहे. घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकर आणि त्याच्या साथीदाराने सीआरपीएफच्या उमेदवारांकडून अडीच कोटी रुपये जमा केले, अशीही माहिती पोलिस तपासात उघड झाली. प्रवीण भटकरच्या एसएसजी या कंपनीकडे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम होते. याचाच गैरफायदा घेत या कंपनीने उमेदवारांकडून पैसे उकळले आणि हा घोटाळा केल्याचे तपासात समोर आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)