नांदेड पालिका निवडणूक : अभिनेत्री मयुरी देशमुख करणार मतदार जनजागृती

नांदेड – ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील मुख्य नायिका मयुरी आशुतोष भाकरे (देशमुख) हिला निवडणूक विभागाने मतदार जनजागृतीसाठी ब्रॅन्ड ऍम्बेसॅडर म्हणून नियुक्त केले आहे. मयुरी ‘खुलता कळी खुलेना’ या टि.व्ही. मालिकेतील मुख्य नायिका आहे. ती नांदेडची सून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता पी. वाय. देशमुख यांची कन्या आहे.

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा तसेच निर्भय आणि निपक्ष वातावरणात मतदान व्हावे यासाठी निवडणूक विभागाकडून जनजागृती मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी इलेक्‍ट्रॉनिक व मुद्रीत माध्यमांसोबतच सोशल मिडीया आणि होर्डींग्ज, बॅनर यासारख्या माध्यमांचा वापर केला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)