नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा; मोठे नुकसान

नांदेड : प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या नांदेड जिल्ह्याला रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपले. या पावसामुळे उकाड्यातून दिलासा मिळाला असला, तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रविवारी नांदेड शहरासह जिल्ह्यातील हदगाव, अर्धापूर, भोकर आदी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे आणि वीजांच्या कडकडाटामुळे शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला. सखल भागात पाणी साचले.

-Ads-

नांदेड शहरात सिडको भागात आणि तरोडा भागात मुसळधार पाऊस पडला. सायंकाळी साडेपाच वाजता शहरातील सिडको भागातून पावसास सुरुवात झाली. सोसाट्याचे वारे आणि विजांचा कडकडाट होवून पावसाचे आगमन झाले.  याशिवाय भोकर, अर्धापूर, हिमायतनगर आणि माहूर तालुक्यांनाही या अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)