नांदेडमध्ये 19 तारखेला काँग्रेसचे मराठवाडास्तरीय विभागीय शिबीर

नांदेड –  ‘मिशन 2019’ अंतर्गत प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने नांदेड येथे 19 एप्रिल रोजी काँग्रेसचे मराठवाडास्तरीय विभागीय शिबीर व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर यांनी आयोजित  पत्रकार परिषदेत दिली.याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, 19 रोजी काँग्रेस पक्षाचे दोन सत्रात कार्यक्रम होणार असून, सकाळचे सत्र हे केवळ निमंत्रितांसाठीच राहणार आहे. पहिल्या सत्रातील मराठवाडास्तरीय शिबीरास सकाळी 10 वाजता येथील भक्‍ती लॉन्समध्ये सुरूवात होईल.

प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या शिबीरास अ.भा.काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन प्रकाश, राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पायलट, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, अ.भा.काँग्रेस कमिटीचे चिटणीस खा.राजीव सातव, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी मंत्री आ.नसीम खान, आ.वर्षा गायकवाड, आ.यशोमती ठाकूर, आ.अमित देशमुख, आ.बसवराज पाटील मुरुमकर, आ.अब्दुल सत्तार, आ.मधुकरराव चव्हाण, आ.दिलीपराव देशमुख, आ.हर्षवर्धन सपकाळ आदिंची उपस्थिती राहणार आहे.

भक्‍ती लॉन्स येथे होणारे पदाधिकार्‍यांचे शिबीर हे केवळ निमंत्रितांसाठीच असून मराठवाड्यातील अ.भा.काँग्रेस कमिटीचे  पदाधिकारी, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, साखर कारखाना, मजूर फेडरेशन, खरेदी विक्री संघ यांचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि संचालक त्यासोबतच विविध फ्रंटलचे जिल्हाध्यक्ष व राज्यपातळीवरील पदाधिकारी हे या मराठवाडास्तरीय शिबीरासाठी निमंत्रित असतील असेही यावेळी आ.राजूरकर यांनी यावेळी सांगितले.दुसर्‍या सत्राची सुरूवात सायं.6 वाजता नवा मोंढा मैदानावरील जाहीर सभेने होणार आहे.

या जाहीर सभेस मराठवाड्यातील उपस्थित काँग्रेसजणांना वरील सर्व मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण हे राहणार असून यावेळी उपरोक्‍त मान्यवरांसह सुप्रसिद्ध शायर इमरान प्रतापगढी यांची उपस्थिती राहणार आहे. नवा मोंढा येथे होणारा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या जाहीर सभेस 50 हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी आ.राजूरकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेस भोकरच्या आ.सौ.अमिताताई चव्हाण, माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत, आ.वसंतराव चव्हाण, महापौर सौ.शिला भवरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी आ.रोहिदास चव्हाण, हणमंतराव पा.बेटमोगरेकर, कोषाध्यक्ष विजय येवनकर, प्रवक्‍ते संतोष पांडागळे व मुन्तजीबोद्दीन यांची उपस्थिती होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)