नांदेडमध्ये स्वत:ची चिता रचून शेतकऱ्याची आत्महत्या 

नांदेड  – राज्यात सततची नापिकी आणि यंदाच्या दुष्काळसदृश्‍य परिस्थितीमुळे उमरी तालुक्‍यातील तुराटी येथील एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चित्ता (सरण) रचून स्वतः पेटवून घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे ऐन दिवाळीत गावात शोककळा पसरली होते.

उमरी तालुक्‍यातील तुराटी या गावातील पोतन्ना राजन्ना बलपीलवाड (वय साठ वर्ष) या शेतकऱ्याने आपल्या शेतात जाऊन एका झाडाखाली लाकडाचे (सरण) चित्ता तयार केली व त्यावर बसून त्याने स्वतःला पेटवून घेतले. या घटनेमुळे गावात कोणाच्याही घरात चूल पेटली नव्हती. हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर अतिशय दुर्गम भागात आहे. गेल्या अनेक वर्षापासून या गावाचा कसल्याच प्रकारचा विकास झालेला नाही. यामुळे खरीप पिकावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याला सततची नापिकी सतावत आहे. आत्महत्या केलेल्या पोतन्ना या शेतकऱ्याकडे भारतीय स्टेट बॅंकेचे अडीच लाख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे 40 हजार आणि सेवा सहकारी सोसायटीचे 40 हजार असे एकूण तीन लाख 20 हजार एवढे कर्ज होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)