नांदेडमध्ये गेन बिटकॉईन कंपनीने घातला अनेकांना कोट्यवधींचा गंडा

नांदेड : गेन बिटकॉईन कंपनीने नांदेडमधील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आता या प्रकरणात नांदेडमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये बिटकॉईनचे आकर्षण दिसून येत आहे. मात्र आता यामध्ये फसवणूक होत असल्याचेही समोर येत आहे.

नांदेड शहरातही या अदृष्य डिजिटल चलनातील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. बिटकॉईन सॉफ्टवेअरची गुंतवणूक केल्यास प्रति महिना 10 टक्के व्याजदर मिळण्याचे अमिष दाखवून गेन बिटकॉईन या कंपनीने अनेकांना गंडा घातला.
नांदेडमधील अनेकांनी या गेन बिटकॉईन कंपनीशी करार करुन आपले बिटकॉईन सॉफ्टवेअर दिले. सुरुवातीला 2 ते 3 महिने अनेकांना 10 टक्के रक्कम प्राप्त झाली. मात्र त्यानंतर गेन बिटकॉईनकडून गुंतवणूकदारांची फसवणूक सुरु झाली.

-Ads-

विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420 आणि 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेडमधील गेन बिटकॉईनचे एजंट बालाजी पांचाळ, राजू मोतेवार, अमोल थोंबाळे आणि मुख्य आरोपी गेन बिटकॉईनचा निर्माता अमित भारद्वाज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)