नांदूरचे उपसरपंच एका मताने विजयी

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील नांदूर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत शेखर दशरथ चिखले एका मताने विजयी झाले आहेत. त्यांनी सारिका वायाळ यांचा पराभव केला. ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच शेखर चिखले यांचा सत्कार करण्यात आला.
नांदूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीसाठी शेखर चिखले आणि सारिका दिनेश वायाळ यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. उपसरपंच पदाच्या लढतीमध्ये 3 विरुद्ध 2 अशी लढत होऊन 1 मताने शेखर चिखले विजयी झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पोपट महाजन यांनी दिली. निवडणुकी दरम्यान ग्रामपंचायतीच्या सदस्या माया संजय जाधव, अश्‍विनी संदीप भालेराव, गणेश पांडुरंग वायाळ हे सदस्य उपस्थित होते. उपसरपंचपदी शेखर चिखले यांची निवड झाल्यानंतर माजी उपसरपंच स्वप्नील जाधव आणि मुक्तादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष अंकित जाधव यांनी सत्कार केला. उपसरपंच निवडी दरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्य बजरंग वायाळ, माजी सरपंच राजेंद्र जाधव, मधुकर जाधव, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष अशोक जाधव, रामदास जाधव समवेत विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
उपसरपंच शेखर चिखले म्हणाले की, यापुढील काळात नांदूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत वाडी-वस्त्यांवरील पाणंद रस्ते व स्टीट लाईटचा प्रश्‍न सोडविला जाईल आणि सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास केला जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)