नांदुर येथील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्‌घाटन

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील नांदुर येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 14व्या वित्त आयोगाच्या योजनेतून अडीच लाख रुपये खर्चून ग्रामस्थांसाठी शुद्ध पाणी केंद्र उभारण्यात आले आहे. येथील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्‌घाटन तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच स्वप्नील जाधव, मुक्तादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष अंकित जाधव, उपसरपंच शेखर चिखले, ग्रामपंचायत सदस्या अश्‍विनी भालेराव, माया जाधव, यशवंत वायाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य बजरंग वायाळ, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष अशोक जाधव, माजी सरपंच राजेंद्र जाधव, भास्कर भालेराव, सिताराम भालेराव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. उषा कानडे म्हणाल्या की, आता गावोगाव 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी मिळू लागल्याने प्रत्येक गावात मोठ-मोठी कामे होऊ लागली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने जलशुद्धीकरण यंत्र बसून घेतलेली आहे. शुद्ध पाणी ही काळाची गरजच होत चाललेली आहे. उपसरपंच शेखर चिखले म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शुद्ध पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ग्रामस्थांनी घरपट्टी भरुन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामे करण्यासाठी सहकार्य करावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)