नांदुर तलाठी कार्यालय रिकामे

  • वापर होत नसल्याने गावातील इमारतीची दुरवस्था

नांदुर – नांदुर (ता. दौंड) येथील तलाठी कार्यालय बांधल्यापासून वापरात आलेले नाही. तलाठीही येथे फिरकत नाहीत. या गावचा कारभार बहुतांश वेळा यवत येथून तर कधीतरी सहजपुर येथील तलाठी कार्यालयातून होतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील लोकांना तलाठी कार्यालयासंबंधी कामासाठी सहजपुर किंवा यवत येथे हेलपाटे मारावे लागत आहेत.
सरकारकडून बहुतांश गावात तलाठी कार्यालय व तलाठ्यांचे निवासस्थान, अशा बहुउद्देशाने इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक गावातील तलाठी एकतर जुन्या तलाठी कार्यालयातून कामकाज पाहत आहेत. नांदुर गाव मुळामुठा नदीकाठी आहे, येथील ग्रामस्थांचे विविध प्रश्‍न तसेच तक्रारी आहेत. मात्र, तलाठीच उपलब्ध नसल्याने तक्रारी करायच्या कोणाकडे? असा प्रश्‍न ग्रामस्थांना पडतो. नांदुर सारख्या गावात तलाठी निवासी असेल तर येथील प्रत्येक अवैध गोष्टीवर अंकुश राहु शकतो. गावात इंटरनेटला रेंज नसल्याने ऑनलाईन कामे करणे शक्‍य नसल्याचे कारण सांगत तलाठी येथे फिरकत नाही, अशीही ग्रामस्थांची तक्रार आहे. तलाठ्याने आपल्या गावातील निवासस्थानी राहावे, असा फतवा काही महिन्यांपूर्वी महसूल विभागाने काढला होता. मात्र, नांदुरच्या तलाठी कार्यालयात तलाठीच काय येथील कोतवालही फिरकत नसल्याने ग्रामस्थ सांगतात. यामुळे तलाठी कार्यालयासाठी सरकारने केलेला लाखो रूपयांचा निधी यामुळे वाया जात आहे.
या कार्यालयाचा महसूल विभागाला वापर करायचा नसेल तर गावपातळीवरील इतर उपक्रमांसाठी ही इमारत वापरण्याची परवानगी द्यावी, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)