नांदुरच्या पोटनिवडणुकीत मयूर घुले बिनविरोध

नांदुर- नांदुर (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत मयूर रामभाऊ घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दौंड पंचायत समितीचे माजी सदस्य व ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ घुले यांचे निधन झाल्यानंतर या रिक्‍त जागेसाठी निवडणूक जाहीर झाली. यावेळी निवडणूक प्रक्रियेनुसार उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत मयुर रामभाऊ घुले, नाना केरबा थोरात यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु या निवडणुकीत अनेक गोष्टीना सामोरे जाण्याचे वातावरण तयार होण्यापूर्वीच गावातील ग्रामस्थ व नेते मंडळी एकत्र आली. या निवडणुकीत नाना थोरात यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे (स्व) रामभाऊ घुले यांचा मुलगा मयुर रामभाऊ घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी दुरगादास शिळकंदे यांनी काम पाहिले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रामदास कोकरे, विठ्ठल घुले, जमालभाई शेख, शिवाजी बर्वे, साहेबराव घुले, दगडू घुले, लक्ष्मण थोरात, राजेंद्र थोरात, विशाल घुले, मनोज थोरात, यशवंत थोरात, विशाल थोरात, धनंजय थोरात, (स्व) रामभाऊ घुले युवा मंचाचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)