नांदलमध्ये वृद्धेची जमीन लाटण्याचा प्रयत्न

पोलिस, प्रशासनाचे दुर्लक्ष : वृद्धेचे 26 जानेवारीपासून बेमुदत उपोषण

फलटण – फलटण तालुक्‍यातील नांदल येथील वृद्धेच्या अशिक्षितपणाचा फायदा उठवून तिची जमीन लाटण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार जमीन लाटणाऱ्यांवर गुन्हा दाखल न झाल्यास 26 जानेवारीला बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत ताराबाई गायकवाड, शशिकांत मोहिते व स्वाती मोरे यांनी उपविभागीय अधिकारी फलटण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदल, ता. फलटण येथील गट नं 264 क्षेत्र 2 हे. 11 आर या शेतजमिनीचे वारसदार असताना व आमचे नाव 7/12 ला असतानाही संमती न घेता तीन खरेदीखताच्या आधारे चंद्रशेखर वसंत जगताप, तनय गणपतराव धुमाळ यांनी जाभळे, कोळेवर तसेच तलाठी, मंडलाधिकरी व दुय्यम निबंधक यांना हाताशी धरून आमचा जमीनीवरती मालकी हक्क असतानाही आमची फसवणूक करून आमची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आहे.

याप्रकरणणी संबंधितांच्याविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यामधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व महसूल व पोलिस कार्यालयांना दि 5 ऑगस्ट 2018 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. तरीही चंद्रशेखर वसंत जगताप, तनय गणपतराव धुमाळ, जांभळे, कोळेकर, तसेच तलाठी, मंडलाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्याविरोधात जाणिवपुर्वक गुन्हे दाखल केले नाहीत.

याचीही तक्रार फलटण पोलिसांकडे केली आहे. मात्र, संबंधितांवर कारवाई होत नसल्याने आम्ही दहशतीखाली असून आता कुंटूबावर आत्महत्येशिवाय मार्ग नाही. आमच्या जिवितास धोका पोहचल्यास सबधितांना जबाबदार धरावे. संबधीत व्यक्तींच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अन्यथा प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशाराही दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)