नांदगावकर यांच्या पत्रकार परिषदेला साध्या वेशात पोलीस?

सरकारने हेरगिरी केल्याचा मनसेचा आरोप
मुंबई – राज्य सरकारकडून हेरगिरी सुरु असल्याचा गंभीर आरोप शुक्रवारी मनसेने केला आहे. मुंबईत मनसे नेते बाळा नांदगावकरांच्या पत्रकार परिषदेमध्ये साध्या वेशात पोलीस वावरत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता ते पोलिसच असल्याचे उघडकीस आले आहे, असे मनसेचे म्हणणे आहे. ही पत्रकार परिषद रेल्वे प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रश्नाबाबत सुरु होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही असाच आरोप केला होता. त्यांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्रॉंचच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी छुप्या रितीने हजेरी लावल्याचे समोर आले होते. तसेच विरोधी पक्ष नेत्यांचे फोनही टॅप होत असल्याचा आरोपही विखे-पाटलांनी केला होता.

कॉंग्रेसपाठोपाठ आता मनसेनेही सरकारकडून हेरगिरी सुरु असल्याचा आरोप केल्याने आता सरकार याविषयी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)