नांगरहर लियोपार्डस संघाचा वेंकटेश प्रसाद प्रशिक्षक

शारजा: अफगाणिस्तान प्रीमियर लीग (एपीएल) स्पर्धेत भारताचा माजी जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद प्रशिक्षक म्हणून पाहायला मिळणार आहे. नांगरहर लियोपार्डस या संघाच्या प्रशिक्षकपदी प्रसादची निवड करण्यात आली असून 5 ऑक्‍टोबरपासून एपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

अफगाणिस्तान प्रीमियर लीगमध्ये नांगरहर लियोपार्डस, काबूल जवानन, पाकतिया पॅंथर्स, बाल्क लीजंड्‌स आणि कंधार नाईट्‌स या पाच संघांचा समावेश आहे. डी स्पोर्ट या वाहिनीवर एपीएलच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. नांगरहर संघाचे नेतृत्व वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल करणार असून अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशिद खान काबूल जवानन संघाचे नेतृत्व करणार आहे.

-Ads-

पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज शाहिद आफ्रिदी पाकतिया पॅंथर्सचे कर्णधारपद सांभाळणार असून अफगाणचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी बाल्क लीजंड्‌सचे नेतृत्व करणार आहे. कंधार नाईट्‌सच्या कर्णधारपदी ब्रॅंडन मॅक्‍युलमची निवड करण्यात आली आहे. मिचेल मॅकलघन आणि ख्रिस गेल हे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने चमकदार कामगिरी बजावली होती. त्यांनी श्रीलंका व बांगला ेदश यांच्यावर विजय मिळविताना आपला दर्जा दाखवून दिला होता. त्यामुळे अफगाणिस्तानमधील या स्पर्धेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)