नांगरतास कुस्ती मैदानात पै. महादेव माने अजिंक्‍य

म्हसवड : हणमंत जाधव व विशाल जाधव यांच्या हस्ते मानाची गदा स्विकारताना पेै महादेव माने. (छाया : नागनाथ डोंबे)

म्हसवड, दि. 4 (प्रतिनिधी) – तब्बल मिनिटाच्या लक्षवेधी झुंझीनंतर पै. महादेव माने याने पै. सुरज देशमुख यास घिस्सा डावावर चारी मुंड्या चित करुन एक्कावन्न हजार व चांदीची गदा इनाम पटकावले . नांगरतास येथिल प्राचीन असणारे शंभु महादेवाच्या मंदिराच्या परिसरात चौथ्या सोमवारी भरत असलेल्या यात्रेनिमित्त देवापुर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या पारंपारिक कुस्ती मैदानात पै.सुरज देशमुख अजिंक्‍य वीर ठरला.
मैदानातील या लक्षवेधी लढतीत पै.महादेव माने याने दहाव्या मिनिटात पट काढुन सुरज देशमुख (आटपाडी) याच्यावर कब्जा मिळविला. या डावावर सुरज देशमुख याने सातव्याच मिनिटात हात टाकुन निसटला यानंतर पंधराव्या मिनिटात आकडी डाव टाकून महादेव माने याने कब्जा मिळविला. त्यानंतरच्या झुंजीत हात काढुन देशमुख यास घिस्सा डावपेचात महादेव माने याने ही कुस्ती जिंकली.
यावेळी या मैदानात बहुसंख्य कुस्त्या लावण्यात आल्या यात बारा कुस्त्या लक्षवेधी होत्या. यात पै. महादेव माने यांने पै. सुरज देशमुख याला घिस्सा डावावर चितपट करून 51 हजार व कै खंडेराव जाधव यांच्या स्मर्णार्थ हणमंत जाधव व विशाल जाधव यांच्या हस्ते चांदीची गदा देवून गौरवण्यात आले.
मैदानात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रा. विश्वंभर बाबर, डॉ. जे. टी. पोळ आदीसह देवापुर पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संखेने हजर होते

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)