नहींबे ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

सातारा, दि. 26 प्रतिनिधी- नहींबे, ता.पाटण येथील गायमुख झऱ्यावरून तामकणे गावास पाणीपुरवठा योजनेस विरोध दर्शविण्यासाठी नहींबे गावातील कोयना धरणग्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरूवात केली.
नहींबे गावातील ग्रामस्थांच्या खासगी मालकीच्या व कोयना प्रकल्प मंडळाने पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण केलेल्या गायमुख झरा येथून तामकणे गावास पाणी पुरवठा योजना करण्याचा घाट राजकीय दबावाखाली घालण्यात आला आहे. या झऱ्यावरून नहींबे ग्रामस्थांना उन्हाळ्यात पुरेसा पाणीपुरवठा होत नसताना दुसऱ्या बाजूला त्याच झऱ्यावरून तामकणे गावास पाणी देण्याचा प्रयत्न होत आहे. वास्तविक तामकणे हे गाव कैरा नदीकाठाला असून गावाच्या भोवताली मोठ्या प्रमाणात ऊसाचे बारामाही पिक घेण्यात येते. शिवाय पाचशे मीटर अंतरावर चिटेघर धरण देखील असून ते बारामाही भरलेले असते. त्यामुळे तामकणे गाव टंचाईग्रस्त नसल्याचे सिध्द होत आहे.
अशा वेळी नहींबे गावच्या झऱ्यावरून योजना करणे हे बेकायदा ठरत असून ते ग्रामस्थांच्या जगण्याच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे. त्यामुळे जो पर्यंत जिल्हाधिकारी याबाबत निर्णय घेणार नाहीत, तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी डॉ.प्रशांत पन्हाळकर, चैतन्य दळवी, हरश्‍चिंद्र दळवी, मालोजीराव पाटणकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)