नहींबे आंदोलनकर्त्यांची सत्यजितसिंह पाटकणरांनी घेतली भेट

 आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना सत्यजितसिंह पाटणकर, शेजारी राजाभाऊ शेलार व चैतन्य दळवी

सातारा,दि.1 प्रतिनिधी- नहींबे ता.पाटण येथील गायमुख झऱ्यावरून शेजारील तामकणे गावास करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेस विरोध करण्यासाठी मागील पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठीय्या आंदोलन करत असलेल्या नहींबे ग्रामस्थांची शनिवारी सत्यजितसिंह पाटणकर यांनी भेट घेतली. दरम्यान, नहींबे ग्रामस्थांवर दबावतंत्रातून होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन पाटणकर यांनी यावेळी दिले.
नहींबे गावातील पाण्याचा झरा खासगी मालकीचा आहे व त्या गावातील ग्रामस्थांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. असे असताना शेजारील तामकणे गावास या झऱ्यावरून पाणीपुरावठा योजना करण्याचा घाट राजकीय दबावातून करण्यात येत आहे. तसेच तामकणे हे गाव कैरा नदीच्या काठाला आहे आणि पाचशे मीटर अंतरावर चिटेघर हे धरण आहे. त्यामुळे तामकणे गावात बारामाही पिके ही घेण्यात येतात. अशी स्थिती असताना नहींबे गावातील झऱ्यावरून तामकणे गावाला पाणीपुरवठा करण्याची बेकायदेशीर योजना करण्यात आली असून त्यास विरोध म्हणून मागील पाच दिवसांपासून नहिंबे ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठीय्या आंदोलन करित आहेत. या आंदोलनकर्त्याचीं शनिवारी सत्यजितसिंह पाटणकर व राजाभाऊ शेलार यांनी भेट घेतली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे चैतन्य दळवी यांनी योजना कशी बेकायदेशीर आहे हे कागदोपत्री दाखवून दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)