नहिंबे ग्रामस्थ आंदोलन तीव्र करणार

 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना नहिंबे ग्रामस्थ

बैठक निष्फळ : अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत असंतोष
सातारा,दि.5 प्रतिनिधी- मागील आठवडाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करित असलेले नहिंबे ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये बुधवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. बैठकीत अधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत नहिंबे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.
पाटण तालुक्‍यातील नहिंबे ग्रामस्थांच्या झऱ्यावरून शेजारील तिमकणे गावासाठी पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, नहिंबे ग्रामस्थांना त्या झऱ्यावरून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी त्या योजनेला विरोध केला आहे. तसेच तिमकणे गावाला शेजारील चिटेघर धरण व केरा नदीवरून पाणीयोजना करावी, अशी भूमिका मांडली आहे. परंतु राजकीय दबावामुळे तिमकणे गावाला नहिंबेच्या झऱ्यावरूनच पाणीपुरवठा करण्याची भूमिका रेटल्याने आंदोलन सुरू करण्यात आले होते. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी, योजना पुर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश आहेत व ते मी पाळणार, असे कैलास शिंदे यांनी सांगितले.इतर स्त्रोतावरून योजना केल्यास खर्च जास्त होणार आहे. तसेच या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी दोन आठवड्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या सभेदरम्यान पालकमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येईल. तो पर्यंत आंदोलन स्थगित करण्यात यावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, डॉ.प्रशांत पन्हाळकर यांनी बैठकीपुर्वी संबधित ठिकाणी योजनेचे काम सुरू करण्यात येवू नये व तसे पत्र द्यावे अशी मागणी केली. परंतु आम्ही तसे पत्र देणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे आंदोलनकर्ते बैठकीतून बाहेर पडले व डॉ.भारत पाटणकर यांच्याशी चर्चा करून आंदोलन व्यापक व तीव्र करणार असल्याचे सांगितले.

अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
दरम्यान बैठक निष्फळ झाल्यामुळे आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आंदोलनकर्ते चांगलेच संतप्त झाले होते. बैठकीनंतर आंदोलनाच्या ठीकाणी दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा बाजी केली. यावेळी अधिकाऱ्यांचे करायचे काय, घाबरणाऱ्या अधिकाऱ्यांचे करायचे काय ? या घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर तब्बत अर्धा तास दणाणून सोडण्यात आला होता.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)