नसरापूर-केळावडे रस्त्याच्या कामासाठी ठराव मंजूर

भोर- चेलाडी (नसरापूर) ते वेल्हा मार्गावर नसरापूर ही बाजार पेठ असून, या रस्त्यावर कायमच वाहतुकीची कोंडी होत असते. ही कोंडी सोडवण्यासाठी भोर तालुका पंचायत समितीचे उपसभापती लहूनाना शेलार यांनी समितीच्या मासिक बैठकीत नसरापूर-केळावडे हा शीव रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, आसा ठराव मांडला असता तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उपसभापती लहूनाना शेलार यांनी दिली.
नसरापूर हे गाव पुणे आणि वेल्हे तालुक्‍याला जोडणारे आहे. नसरापूर हे गाव बाजार पेठ आसल्याने येथे कायमच बाजारहाटसाठी येणाऱ्या लोकांमुळे वर्दळीचे ठरत असल्याने आणि या परिसरात होत आसलेली बांधकामे, तसेच वाढती लोकसंख्या याचा विचार करता रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांना या वाहतुक कोंडीमुळे होणारा मनस्ताप थांबण्यासाठी नसरापूर-केळावडे हा दोन कि. मि.अंतराचा पर्यायी रस्ता फायदेशीर ठरणार असल्याने हा ठराव भोर तालुका पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडला होता. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली असून पुढील प्रशासकीय कार्यवाही लवकरच पूर्ण करून या रस्त्याचे काम मार्गी लावले जाईल, असा विश्वास उपसभापती लहूनाना शेलार यांनी माहिती देताना व्यक्त केला.
नसरापूर येथे बनेश्वर हे पर्यटन क्षेत्र असल्याने सुटीच्या दिवशी नसरापूरला कायमच रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडीत भर पडत आसल्याने नसरापूर-केळावडे हा पर्यायी रस्ता व्हावा अशी येथेल नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. हा रस्ता शीव रस्ता असून पुणे- सातारा महामार्गालगत असणाऱ्या केळावडे गावच्या हद्धीतून जाणार आहे. तो बनेश्वर मार्गे वेल्ह्याला जाण्यासाठी जोडला जाणार असून, याचे अंतर 2 कि. मी. एवढे आहे तर मूळ रस्ता चेलाडी ते बनेश्वर फाटा हा तीन कि. मी.चा आहे. या रस्त्यामुळे बाजारपेठेत होणारी नित्याची वाहतूक कोंडी कायमची सोडवली जाणार असल्याचे सांगून नसरापूर-केळावडे शीव रस्ता खुला होण्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार असल्यानेच हा ठराव सभेत मांडला आसल्याचे उपसभापती लहूनाना शेलार यांनी आवर्जून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)