नशीब बलवत्तर म्हणून अपघात टळला

केडगाव – वेगात असलेल्या रेल्वेगाडीने ट्रॅक बदलल्याने प्रवाशांचा थरकाप उडाला. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून अपघात टळला.
बुधवारी (दि.28) रात्री 8.15 च्या सुमारास पुणे-बारामती सवारी रेल्वेगाडी खूटबाव रेल्वे स्टेशनवरून निघून केडगाव स्टेशनवर येत असताना खुटबाव ते केडगाव 10 मिनिटाचे अंतर आहे. परंतु चालकाने रेल्वेगाडीचा वेग कमी न करता अतिशय वेगाने केडगाव स्टेशनवर आणली. त्यामुळे रेल्वेगाडी 200 मीटरपर्यंत हेलकावे खात होती.

यावेळी रेल्वेगाडीत 8000 प्रवासी प्रवास करीत होते. केडगाव परिसरात विविध गावांच्या यात्रा आणि सुट्ट्यांचा कालावधी असल्याने रेल्वेगाडीत गर्दी होती. वास्तविक रेल्वेगाडी स्थानकात येण्यापूर्वी एक किलोमीटरवर तिचा वेग कमी केला जातो. परंतु चालकाने परिस्थितीचे गांभीर्य समजून न घेता भरधाव वेगाने रेल्वेगाडी स्थानकात नेली. त्यामुळे प्रवाशांनी आरडाओरडा केला. एकमेकाच्या अंगावर पडले. बांकावर बसलेले खाली पडले. काही दरवाज्यात उभे होते. सर्वांना मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचे जाणवले. रेल्वेगाडी थांबल्यानंतर काही प्रवाशांनी चालकाला धारेवर धरले. तर काहींनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. त्याच चालकाने पुन्हा रेल्वेगाडी दौंडवरून बारामतीला नेली. पण, नशीब बलवत्तर म्हणून या सर्वांचे प्राण वाचले, अशा चर्चा दिवसभर सुरू होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)