पिंपरी – सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार थेरगाव येथे घडला.
सायली आहेर (वय-20) असे या नवविवाहितेचे नाव आहे. तिच्या 60 वर्षीय आजीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पती करण आहेर, अर्जुन आहेर, दीर आणि दोन नणंदा (सर्व रा. गुजरनगर कॉलनी, डांगे चौक, थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. सायली व करण यांचा 11 मे 2018 रोजी विवाह झाला होता. विवाहाच्या वेळी सायलीच्या माहेरच्यांनी 3 लाख रुपये, मुलाच्या कापड्यासाठी पैसे आणि मुलीच्या दागिन्यांसाठी दीड लाख रुपये दिले. करण याच्या एका बहिणीचे लग्न झाले आहे. तिला तिच्या मनाप्रमाणे पती मिळाला नाही, ती सासरी नांदायला जात नाही. यामुळे करण याच्या घरच्यांनी सायलीला त्रास देण्यास सुरुवात केली. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा