नव भारताच्या निर्मितीसाठी भ्रष्टाचाराला आळा घालणे आवश्‍यक: राष्ट्रपती 

नवी दिल्ली: नव भारताच्या निर्मितीसाठी भ्रष्टाचाराला आळा घालणे आवश्‍यक असल्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी म्हटले आहे. केंद्रीय सतर्कता आयोगाने आयोजित केलेल्या दक्षता सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते. “भ्रष्टाचार निर्मूलन- नव भारताची निर्मिती’ ही यावर्षीच्या दक्षता सप्ताहाची संकल्पना आहे. घेण्यात आलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली कृती ही पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि न्याय्य आहे.

हा जनतेचा विश्वास सातत्याने वृद्धींगत व्हायला हवा यावर राष्ट्रपतींनी भर दिला. या संदर्भात तंत्रज्ञान आणि इंटरनेट यांची मोठी मदत होऊ शकते असे ते म्हणाले. सार्वजनिक खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जीईएम (एच्‌) ऑनलाईन प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. डिजिटल यंत्रणेचा स्वीकार केल्यामुळेही भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मदत होईल असे राष्ट्रपती म्हणाले. आर्थिक गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी आणि या गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)