नव्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका फेटाळली

नवी दिल्ली – नवे सरन्यायाधीश म्हणून रंजन गोगोई यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. गोगोई यांच्या नियुक्तीबाबत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दर्शवला. आर.पी.लुथ्रा आणि सत्यवीर शर्मा या वकिलांनी गोगोई यांच्या नियुक्तीला आव्हान दिले होते.

काही महिन्यांपूूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या चार सर्वांत वरिष्ठ न्यायाधीशांनी विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात एकप्रकारे बंडाचे निशाण फडकावले. त्या न्यायाधीशांमध्ये गोगोई यांचाही समावेश होता. त्या घडामोडीचा आधार याचिका दाखल करताना घेण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरिष्ठ न्यायाधीशांची कृती म्हणजे न्यायव्यवस्थेशी घातपात करण्यासारखाच प्रकार होता, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते. मिश्रा यांच्या निवृत्तीनंतर गोगोई 3 ऑक्‍टोबरला सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)