नव्या वाहनांसाठी थर्ड पार्टी विम्याचे कवच

नियम लागू : दुचाकी वाहने किमान 5 ते 6 हजारांनी महागणार

पुणे – नव्या वाहनांची नोंदणी करताना आता थर्ड पार्टी विमा बंधनकारक करण्यात आला आहे. यानुसार नव्या दुचाकी वाहनाला पाच तर चारचाकीसाठी तीन वर्षाचा विमा काढवा लागणार आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवार (दि.1) पासून या नियमाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. आता वाढीव दराने वाहने खरेदी करावी लागणार आहेत.

देशात अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांचा अपघातामध्ये मृत्यू होत आहे. अपघातांधील वाहनांना थर्ड पार्टी विमा नसल्यामुळे अपघातात मृत व्यक्‍तीच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून मदत करताना मर्यादा येतात. या पार्श्‍वभूमीवर न्यायालयात याचिका दाखल करून हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. यानंतर न्यायालयाने यावर सुनावणी करताना थर्ड पार्टी विमा बंधनकारक करुन विम्याचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला. यानुसार एक सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी वाहनांना एक वर्षाचा विमा बंधनकारक होता. त्यानंतर विम्याचे नूतनीकरण केले जात होते. पंरतु या एक वर्षानंतर नूतनीकरणावर लक्ष दिले जात नसे. मात्र, आता दुचाकीला पाच तर चारचाकी वाहनांना तीन वर्षाचा विमा काढावा लागणार आहे. विम्याची रक्‍कम ही गाडीच्या क्षमेतनुसार ठरणार आहे. दरम्यान, शहरातील बहुतांश शोरूम मालक आणि ग्राहकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती नसल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. तसेच काही शोरूम चालकांनी यासंदर्भात तातडीने अमंलबजावणीस सुरूवात केल्याचे दिसून आले आहे.

वाहन प्रकार विमा (किमान थर्ड पार्टी)


दुचाकी नोंदणी दिनांकापासून पाच वर्षे


चारचाकी नोंदणी दिनांकापासून तीन वर्षे

जुन्या वाहनांबाबत बदल नाही
नवीन वाहनांची खरेदी करताना विम्याच्या नियमात बदल केला असला तरीही जुन्या वाहनांसाठी नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशा प्रकारचे कुठलेही निर्देश न्यायालयाने दिले नाहीत. तसेच विमा कालावधीबाबतही सांगण्यात आले नाही. यामुळे जुन्या वाहनांच्या विम्याचे नूतनीकरण करताना सध्यातरी जुन्या पध्दतीप्रमाणेच करावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)