नव्या वर्षात व्यायाम जरुर करा…

व्यायामाचे काही महत्त्वाचे फायदे असे आहेत...

चरबीचे प्रमाण कमी होते. स्नायूंचे प्रमाण वाढते.
शरीराचे वजन स्थिर राहिले तरी स्नायूंचे वजन वाढते आणि चरबीचे कमी होते.
गोळ्या न घेता रक्‍तदाब कमी होतो. ह्रदयावरील दडपणही कमी होतं.
हाडे बळकट होतात, सांध्यांचे आरोग्य सुधारते, सांध्यांची लवचिकता वाढते.
रोग प्रतिकारक शक्‍ती वाढते.
मेंदूची कार्यक्षमता वाढते.
औदासिन्य, नैराश्‍य कमी होते.
चालण्यातील डौल सुधारतो.
भुकेवर नियंत्रण ठेवता येते.
कंप येणारे आजार कमी होतात.

खालील सवयी लावून घ्या…

नाश्‍ता टाळू नका.
धपाटे, थालिपीठ, पोहे, उपमा खा
उठल्या उठल्या फळे खा, दूध प्या.
जेवताना चटणी, कोशिंबीर, भाजी-पोळी, भात-आमटी उसळ असे सगळे जेवण घ्या.
4 वाजता एखादे फळ, राजगिरा लाडू असे खा.
7 वाजता मिश्र पिठाची भाकरी आणि एखादी पालेभाजी खा. वरण-भात खाल्ला तरी हरकत नाही.
10 वाजता दुध पिऊन झोपी जा.

खाण्याचे हे असे वेळापत्रक सांभाळले तर आरोग्य चांगले राहील. ऋतूनुसार भाज्या, फळे, विविध पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. हे चालत नाही, ते आवडत नाही अशा गोष्टी या वयात आता बाजूला ठेवा. असेल त्या पथ्याचंच परंतु शक्‍यतो वेगळं वेगळं असं काही करून खा. आपल्याबरोबरच आपल्या घरच्यांनाही यात समाविष्ट करून घ्या. मागील लेखात दिल्याप्रमाणे सोयाबीनचे पदार्थ जास्तीत जास्त खा. परंतु व्यायाम चुकवू नका. नाश्‍ता करताना तो पोटभरीचा आणि व्यायाम जरुरीपुरता करावा. या गोष्टी दररोज पाळाव्यात. आहार व्यायाम झाला तसे आता मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्‍यक आहे. मानसिक आरोग्य राखण्यासाठी खास वेळ द्या. छंद जोपासा. शिवणकाम, भरतकाम, कागदी फुले बनवणे, पिशव्या तयार करणे, शोभिवंत वस्तू तयार करणे या अशा गोष्टींचे छंद अनेक जणींना असतात. जर नसतील तर यापैकी काहीतरी बसल्या बसल्या करता येईल असे काही शिका. सतत माणसात, समाजात वावरा. किमान अर्धा तास स्वतःसाठी द्या. ध्यानाची सवय लावून द्या. शास्त्रीय संगीत ऐकण्याची सवय लावून घ्या. ते कळो अथवा न कळो ऐका. घरी बाग असेल तर बागकामाचा छंद जोपासा. निसर्गाच्या सानिध्यात तेवढाच वेळ छान जाऊ शकेल. स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आपल्या जोडीदारालाही या आपल्या अवस्थेबद्दल जास्तीत जास्त माहिती द्या. त्याला आवर्जून डॉक्‍टरांकडे घेऊन जा. रजोनिवृत्ती आणि या काळातील बदलते जीवन याची शास्त्रोक्‍त माहिती करून द्या. या काळातील तुमच्यातील शारीरिक आणि मानसिक संबंध कसे असावेत याबद्दल त्याच्याशी चर्चा करा. त्याला याबाबत समजावून सांगा. स्वतःवर आणि आपल्या जोडीदारावर विश्‍वास ठेवा.

या सगळ्यात महत्त्वाचे आहे ते, नियमित व्यायाम करणे. नियमित व्यायाम करत राहिल्यास अतिरिक्‍त वजनवाढ रोखता येते. काहीजणी सांगतात आम्ही रोज व्यायाम केले पण तरीही वजन वाढलेच. मग आम्ही योगाचा क्‍लास लावला. काहींनी जिम लावली, काही पोहण्याचा क्‍लास करायला लागातात तर काही रमत-गमत फिरायला जातात आणि हाच व्यायाम असेही समजतात. पण बायांनो एक लक्षात ठेवा, केवळ व्यायाम करणं इतकंच पुरेसं नाही. वजन आटोक्‍यात ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ही महत्त्वाचं असतं. खरं तर आहार, व्यायाम, मन:शांती आणि आवडीच्या छंदातून मिळणारा आनंद या चतु:सुत्रीचा एकत्रित अवलंब केला तरंच वजन आपल्या अपेक्षेनुसार नियंत्रित राहू शकते. यामुळे रजोनिवृत्तीच्या काळातील अवघड परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळही मिळेल.
तर या चतु:सूत्रीची माहिती घेताना सुरूवातंच व्यायामाने करता येईल.

व्यायाम –

व्यायामाचे खरं तर चार प्रकार आहेत.
शक्‍ती वाढवविणारे व्यायाम
लवचिकपणा वाढवणारे व्यायाम
दमश्‍वास वाढवणारे व्यायाम
चिवटपणा वाढवणारे व्यायाम
व्यायाम हे नियमितपणे आणि रोजच करायला हवेत. ज्याप्रमाणे शरीराला मिळालेल्या जीवनसत्वांची शक्‍ती दररोज शरीराकडून वापरली जाते, तशीच व्यायामाने मिळवलेली शक्‍तीही वापरली जाते. शिवाय या वयात व्यायाम केल्याने भावनांचे विरेचन करणेही सोयीचे होते. ते सुयोग्य प्रकारे होते.

डॉ. शीतल जोशी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)