नव्या वर्षात टाळल्याच पाहिजेत अशा चुका (भाग-१)

प्रथमतः सर्व वाचकांना आणि गुंतवणूकदार वाचकांना २०१९ हे वर्ष आर्थिक भरभराटीचे व समृद्धीचे जावो यासाठी शुभेच्छा. २०१८ मधील आपल्याकडून झालेल्या आर्थिक चुका व भ्रमातून निर्माण झालेल्या गैरसमजुतीमुळे घेतलेल्या निर्णयांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी नव्या वर्षात घेतली तर नक्की आपली आर्थिक भरभराट होणार आहे.

गुंतवणुकीसंदर्भातील कोणत्या चुका टाळायच्या आणि अनेक बाबतीत नव्याने कसा विचार करायचा याची यादी पुढील प्रमाणे. नव्या वर्षात कुठलीही गुंतवणूक करताना या मुद्यांचा विचार करून मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

१) औदार्य हे भारतीयांच्या रक्तातच आहे. बराचवेळा आपण क्रेडिट कार्ड कंपन्यांना नकळत तीस ते पन्नास टक्के व्याज देऊन जातो. हे आपण निश्चित टाळायला हवे. क्रेडिट कार्डचा वापर शक्यतो टाळणे किंवा क्रेडिट कार्डवर कधीही थकबाकी असणार नाही, हा स्वाभिमानाचा मुद्दा करणे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

२) गुंतवणुकीतही आपण साधारणपणे परंपरा पाळत असतो. आपल्या वडिलधाऱ्यांनी वेळोवेळी बँकेत मुदतठेवींमध्ये पैसे गुंतवलेले होते आणि आपण आजसुद्धा याच गुंतवणूक प्रकाराचा जास्तीत जास्त वापर करत असतो. काळानुसार निर्माण झालेले गुंतवणुकीचे अनेक उत्कृष्ठ पर्यायांचा विचार करून गुंतवणुकीच्या नव्या आणि कायदेशीर साधनांमध्ये गुंतवणुकीला प्रारंभ केला पाहिजे.

३) गुंतवणुकीतील परंपरेचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे सोन्यामध्ये होत असणारी मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूक. गरजेपुरते दागदागिने घेणे हे योग्य. परंतु कमावलेले पैसे सातत्याने याच प्रकारात गुंतवणे टाळले पाहिजे. सोन्यातील गुंतवणुकीत मिळणारा वार्षिक परतावा निश्चितच तपासला पाहिजे. तसेच जोखिम आणि सोन्याची शुद्धता यांचाही विचार केला पाहिजे.

४) बराचवेळा आपण पारंपारिकदृष्ट्या पुढच्या पिढीसाठी जास्तीत जास्त प्रॉपर्टीज (घर, फ्लॅट, शेतजमीन, दुकानासाठी गाळा, ऑफिससाठी जागा) घेऊन ठेवण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी तीस ते चाळीस वर्षे किंवा त्याहून अधिक काळ आपण अशा प्रॉपर्टी सांभाळत आलेलो असतो. परंतु एवढा काळ जर आपण इक्विटी म्युच्युअल फंडासाठी गुंतवणुकीसाठी दिला तर निर्माण होणारी संपत्ती अनेक पटींनी जास्त असू शकते.

५) अनेक वेळा अनावश्यक खर्च केले जातात. उदा. पन्नास हजारांपेक्षा जास्त रकमेचा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ईएमआय भरला जातो. परंतु अनेक वेळा या स्मार्टफोनच्या दहा टक्के वैशिष्ट्यांचाही वापर आपण करत नाही.

६)  सातत्यपूर्ण नवनवीन वस्तूंसाठी सारखे पैसे खर्च करणे टाळले पाहिजे. जर वस्तुची खरच गरज निर्माण झाली असेल तरच खर्च करावा. मित्राने, नातेवाईकांनी किंवा शेजाऱ्याने खरेदी केली म्हणून लगेच तशीच वस्तू खरेदी करण्याची गरज नसते.

७) विमा निवडताना बहुतांशी वेळा तो किती परतावा देणार आहे. मला दहा, पंधरा किंवा वीस वर्षांनी किती रक्कम मिळणार आहे याचा विचार करूनच विमा खरेदी केला जातो. प्रामुख्याने आपले वय लक्षात घेऊन आपल्यावर असणाऱ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या व भविष्यातील उत्पन्नाची सांगड घालत संरक्षण म्हणूनच शुद्ध विम्याची खरेदी केली पाहिजे. गुंतवणूक म्हणून विमा खरेदी करू नये. परताव्याच्या अमिषाने तर विमा कधीच खरेदी करू नये.

नव्या वर्षात टाळल्याच पाहिजेत अशा चुका (भाग-२)

नव्या वर्षात टाळल्याच पाहिजेत अशा चुका (भाग-३)

८)  उत्पन्नाच्या ५० ते ६० टक्के भाग मासिक हप्त्यापोटी (ईएमआय) अनेकवेळा दिला जातो. त्यामुळे मासिक हप्ते पगाराचा मोठा भाग खाऊन टाकत असतात. एक स्वतःचे घर सोडले तर अन्य कुठल्याही गोष्टी कर्ज काढून खरेदी करू नयेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)