नव्या वर्षात टाळल्याच पाहिजेत अशा चुका (भाग-३)

प्रथमतः सर्व वाचकांना आणि गुंतवणूकदार वाचकांना २०१९ हे वर्ष आर्थिक भरभराटीचे व समृद्धीचे जावो यासाठी शुभेच्छा. २०१८ मधील आपल्याकडून झालेल्या आर्थिक चुका व भ्रमातून निर्माण झालेल्या गैरसमजुतीमुळे घेतलेल्या निर्णयांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी नव्या वर्षात घेतली तर नक्की आपली आर्थिक भरभराट होणार आहे.

नव्या वर्षात टाळल्याच पाहिजेत अशा चुका (भाग-१)

नव्या वर्षात टाळल्याच पाहिजेत अशा चुका (भाग-२)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुंतवणुकीसंदर्भातील कोणत्या चुका टाळायच्या आणि अनेक बाबतीत नव्याने कसा विचार करायचा याची यादी पुढील प्रमाणे. नव्या वर्षात कुठलीही गुंतवणूक करताना या मुद्यांचा विचार करून मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

१७) अनेकदा कमावलेल्या पैशाचे महत्त्व नेमके न समजल्याने अनेक अनावश्यक बाबींवर पैसे खर्च केले जातात व उतारवयातील पैशांची गरज लक्षात घेता खूप उशीरा पैसे गुंतवणूक करण्यास सुरवात केली जाते. हे टाळायला हवे. शक्य तितक्या तरुणवयात पैशांची गुंतवणूक करण्याची सवय लावून घेतली पाहिजे.

१८) सुरवातीला ठरवलेली आर्थिक उद्दीष्टे काही वर्षानंतर सोडून दिली जातात. कारण आर्थिक शिस्तीत पाळणे प्रत्येकवेळी शक्य होत नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे त्या व्यक्तीचा आळस असतो.

१९) लवकरात लवकर भरपूर पैसे कमावण्यासाठी जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या पर्यायांचा जोखिम लक्षात न घेता गुंतवणुकीसाठी विचार केला जातो. बहुतांश वेळी अशा पर्यायांमध्ये मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

२०) अनेकवेळा गुंतवणूक पर्यायांमध्ये नेमके काय वैशिष्ट्य आहे हे विचारले जाते. परंतु सदर पर्याय माझ्या गरजांसाठी योग्य आहे का व माझ्या जोखिम घेण्याच्या तयारीनुसार व गुंतवणुकीसाठी उपलब्ध असणाऱ्या वेळेनुसार हा योग्य पर्याय आहे का याचा विचार करण आवश्यक आहे.

२१) खूप वेळा गुंतवणूक केल्यावर माझे नुकसान तर होणार नाही ना, या विचाराने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाच जात नाही व त्यामुळे गुंतवणुकीच्या अनेक संधी घालवून बसतो.

२२) गुंतवणूक करत असताना गुंतवणूक तज्ञांचे मत व त्यांची मदत न घेता आपल्या मित्र परिवाराकडून अथवा नातेवाईकांकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार गुंतवणूक केली जाते. सातत्याने होणाऱ्या आर्थिक नियमातील बदलांमुळे व नवनवीन पर्यायांची उपलब्धतांची माहिती न घेता गुंतवणूक करणे टाळले पाहिजे.

२३) गुंतवणूक करत असताना मिळवलेल्या परतावाव्यावर नेमका किती कर भरावा लागणार आहे याचा विचार करायला हवा.

२४) उत्पन्न कमावत असताना शक्यतो कर्ज घेणे टाळावे आणि कर्ज घेतलेच असेल तर त्याचे योग्य परतफेडीचे नियोजन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)