नव्या वर्षात टाळल्याच पाहिजेत अशा चुका (भाग-२)

प्रथमतः सर्व वाचकांना आणि गुंतवणूकदार वाचकांना २०१९ हे वर्ष आर्थिक भरभराटीचे व समृद्धीचे जावो यासाठी शुभेच्छा. २०१८ मधील आपल्याकडून झालेल्या आर्थिक चुका व भ्रमातून निर्माण झालेल्या गैरसमजुतीमुळे घेतलेल्या निर्णयांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी नव्या वर्षात घेतली तर नक्की आपली आर्थिक भरभराट होणार आहे.

नव्या वर्षात टाळल्याच पाहिजेत अशा चुका (भाग-१)

गुंतवणुकीसंदर्भातील कोणत्या चुका टाळायच्या आणि अनेक बाबतीत नव्याने कसा विचार करायचा याची यादी पुढील प्रमाणे. नव्या वर्षात कुठलीही गुंतवणूक करताना या मुद्यांचा विचार करून मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

९)  समाजात दुसऱ्यांना दाखवण्यासाठी अनेकवेळा खर्च केले जातात व त्यावेळी स्वतःच्या भविष्यातील गरजांचा विचार न केल्याने गुंतवणुकीचे नियोजन करणे राहून जाते.

१०) `नियोजन व बजेट’ हे शब्द आपण बराचवेळा ऐकत असतो पण याचा खऱ्या अर्थाने स्वतःसाठी वापर करत नाही. पैशाचे योग्य नियोजन व खर्चाचे बजेट ठरवणे हे अत्यंत आवश्यक आहे. उत्पन्न – बचत(गुंतवणूक) = खर्च हे सूत्र अंगीकारले पाहिजे.

११) महागाई आटोक्यात ठेवणे हे फक्त सरकारचे काम आहे आणि महागाईवर मात करण्यासाठी आपण काहीच करायचे नसते असा बहुतेकांचा गैरसमज असतो. येणाऱ्या काळात येऊ घातलेल्या महागाईवर मात करण्यासाठी गुंतवणुकीच्या योग्य पर्यायांमध्ये पैसे गुंतवणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

१२) अनेक वेळा आर्थिक शिस्तीचा अभाव जादाचा खर्च करण्यास भाग पाडतो. वेळेवर सर्व देय बिलांचे पैसे जमा केल्यास लागणारा जादाचा आकार (लेट फी) अथवा दंड टाळता येऊ शकतो.

१३) अनेक वेळा भविष्याचा विचार न करता आज किंवा उद्याच्या विचाराने जगणे व त्यासाठीचा खर्च करत राहणे हे योग्य नाही. भविष्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कठीण काळासाठी, खर्चासाठी निश्चितच विचार करून पैशांचे नियोजन करणे आवश्यक आहे.

१४) शेअर बाजारात जर मोठी पडझड झाली की मगच मी गुंतवणूक करणार आहे व त्यासाठीचा योग्य दिवसाची वाट पहात राहणार व गुंतवणूक करणार नाही हे निश्चित टाळायला हवे.

१५) अचानक येणाऱ्या खर्चांसाठीचे नियोजन न करणे हे देखील अनेक वेळा घातक ठरू शकते. यासाठी किमान काही रक्कमेची कायम तरतूद करून ठेवणे अनेकवेळा राहून जाते.

१६) जास्तीत जास्त पैसे कसे कमावता येतील यासाठी ९९ टक्के लोक प्रयत्न करत राहतात. परंतु कमावलेला पैसा योग्य ठिकाणी कसा गुंतवायचा यासाठी मात्र केवळ एक टक्के लोक वेळ देतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)