नव्या वर्षाचे १० आर्थिक संकल्प (भाग-१)

नव्या वर्षात नवे संकल्प करण्याची पद्धत आहे. यावर्षी असे काही आर्थिक संकल्प केले पाहिजेत, ज्यामुळे आपल्या मनात भविष्यातील आर्थिक असुरक्षितता दूर होईल. त्यातील प्रमुख असे :

१. आपण व्यवहार करत असलेल्या बँका, गुंतवणूक, जीवनविमा, आरोग्य विमा, वाहन विमा, घराची आणि इतर मालमत्तेचे कागदपत्र एकत्र ठेवून त्याच्या नोंदी एका डायरीत करून ठेवीन. बँक खात्यांची संख्या वाढली असल्यास ती कमी करीन.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

२. आरोग्य विमा काढला नसेल तर तो लवकरात लवकर काढून घेईन.

३. पॅन, आधार, डेबिट कार्ड आणि लायसनच्या कॉपी काढून त्या महत्वाच्या कागदपत्रांत ठेवून देईन.

४. सर्व बँका, सर्व गुंतवणुकीशी आधार कार्ड लिंक करून टाकीन.

नव्या वर्षाचे १० आर्थिक संकल्प (भाग-२)

५. म्युच्युअल फंड, आयपीओ आणि शेअर बाजारात गुंतवणूक करावयाची असल्यास त्यासाठी बंधनकारक असलेले डीमॅट खाते काढून घेईन आणि त्याचे परिणाम आधी समजून घेईन. ही सर्व गुंतवणूक सुरवातीस आर्थिक सल्लागार किंवा गुंतवणूक कळणाऱ्या मित्रामार्फत करीन. जी रक्कम नजीकच्या काळात लागणार आहे, ती गुंतवणुकीत अडविणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)