नव्या वर्षाचे १० आर्थिक संकल्प (भाग-२)

नव्या वर्षाचे १० आर्थिक संकल्प (भाग-१)

नव्या वर्षात नवे संकल्प करण्याची पद्धत आहे. यावर्षी असे काही आर्थिक संकल्प केले पाहिजेत, ज्यामुळे आपल्या मनात भविष्यातील आर्थिक असुरक्षितता दूर होईल. त्यातील प्रमुख असे :

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

६. क्रेडीट कार्ड शक्यतो वापरणार नाही आणि वापरले तरी एकच वापरेन. त्याचे हप्ते कधीच थकवू देणार नाही.

७. मोबाईल बील, वीज बील, महापालिका कर, विमा हे डिजिटल पद्धतीने भरायला सुरवात करेन, रेल्वे आणि बसचे तिकीट ऑनलाईन काढीन, ज्यामुळे वेळ आणि पैसा वाचतो. मात्र या व्यवहारात जे पासवर्ड वापरले जातात, ते विशिष्ट काळाने बदलत राहीन आणि ते बदल एका छोट्या डायरीत लिहून ठेवेन. ती डायरी कधीच घराबाहेर नेणार नाही. बँक किंवा क्रेडीट कार्ड कंपनीकडून फोन करतो, असे सांगून युजर आयडी, पासवर्ड, जन्मगाव आणि जन्म तारीख विचारणाऱ्या फोनवर काहीही माहिती देणार नाही.

८. डिजिटल व्यवहारासाठी ऑनलाईन बँकिंगसारखा एक आणि एकच अॅप वापरीन. डिजिटलचे सर्व पर्याय वापरण्याचा मोह बाजूला ठेवीन. कॅशबॅकसारख्या मार्केटिंगच्या फेऱ्यात अडकून गरज नसलेल्या वस्तू किंवा सेवा खरेदी करणार नाही.

९. मोठी खरेदी करताना तिची आपल्याला खरोखरच गरज आहे का, याचा दहा वेळा विचार करीन.

१०. कमी काळात अधिक लाभ होतो म्हणून ज्या अनेक योजना सांगितल्या जातात किंवा त्यात पैसे टाकण्याचा सल्ला दिला जातो, त्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)