नव्या रस्त्याला कृत्रिम स्पीड ब्रेकरचा ब्रेक

सातारा (प्रतिनिधी)-
म्युन्सिपालटीच्या कारभाराचे दाखले क्षुल्लक कारणासाठी का दिले जातात, हे सातारा पालिकेचा कारभार पाहिल्यावर सहज लक्षात येते. नवे रस्ते खोदण्याची शर्यत लागली आहे का, असा सवाल पालिकेकडून वारंवार सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांचे मणके या कारभारात मोडले जात आहे. त्यामुळे पालिकेचे धोरण म्हणजे ‘आजारापेक्षा उपचार दुर्धर’ असेच म्हणावे लागेल.
जिल्ह्यात सातारा पालिका एकमेव अ वर्ग असल्याने शासन अनुदान आणि निधी मोठ्या प्रमाणात येतो. सव्वा दोनशे कोटीचे बजेट असलेल्या सातारा पालिकेने रस्ते बनवण्यासाठी रस्ते अनुदानासह दलित व दलितेत्तर निधीसह पालिका फंडातून मोठ्या प्रमाणात खर्च केला. मुळात रस्त्याचे अंदाजपत्रकानुसार कामच होत नसले तरी पाण्यासाठी रस्त्याला डागण्या देण्याचे काम अविरहतपणे सुरू असून या माध्यमातून मक्तेदार पोसण्याचे काम सोयीनुसार सुरू आहे. या खेळात कोट्यवधींचा चुराडा होत असताना नागरिकांच्या वाट्याला दुखणे येत असून हे प्रकार कधी बंद होणार असा सवाल निर्माण होत आहे.
पाणी सर्वांना मिळाले पाहिजे आणि ते देण्याची व्यवस्था पालिकेची आहे. मात्र, सर्वांना समान न्याय कायद्यात असून पालिकेने धनदांडग्यांना वेगळे नियम केले आहेत का, हा सवाल रस्ते खुदाई सुरू असताना पडतो. शहरात सुमारे दिड हजार बोगस नळ कनेक्‍शन असताना पाण्यासाठी सुरू असलेली नित्याची रस्ते खुदाई कशासाठी सुरू आहे, हे सुज्ञ सातारकरांना वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र,हे पालिका प्रशासनाच्या लक्षात येत नसेल, तर ते सातारकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल. कारण रस्त्यांच्या खुदाईमुळे सरकारी रुग्णालयातील माहितीनुसार पाठदुखी, कान-नाक आणि घश्‍यासह श्वसनाच्या विकारात गेल्या दोन वर्षात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे दर्जेदार करताना सततचे खोदकाम रोखण्याचे काम पालिकेतील सत्ताधाऱ्यांना भविष्यात करावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)